आज आज गुढीपाडवा नव्या वर्षाचा पहिला दिवस. घरीच असल्यामुळे सौ. ला मदत करण्याचा निश्चय केला. सौने बटाट्याची भाजी बनविण्याचे कार्य दिले. अर्धा किलो बटाटे आधी कुकर मध्ये उकडून घेतले. बटाटे सोलून बटाट्याचे चार ते सहा तुकडे केले. कढई गॅसवर ठेवली. दोन चमचे साजूक तूप त्यात घातले. तूप गरम झाल्यावर गॅस स्लो केला. नंतर अर्धा चमचा जिरे, एक चमचा तीळ,अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचे तिखट टाकले. नंतर त्यात बटाटे परतून घेतले. त्यानंतर स्वादानुसार मीठ आणि आमसूल टाकले व पुन्हा बटाटे परतले. नंतर झाकण ठेऊन दोन मिनिट वाफ काढून घेतली. स्वादिष्ट भाजी,श्रीखंड पुरी सोबत खाताना मजा आली.
Thursday, March 26, 2020
नूतन वर्ष: बटाट्याची भाजी ( नवी स्टाईल)
आज आज गुढीपाडवा नव्या वर्षाचा पहिला दिवस. घरीच असल्यामुळे सौ. ला मदत करण्याचा निश्चय केला. सौने बटाट्याची भाजी बनविण्याचे कार्य दिले. अर्धा किलो बटाटे आधी कुकर मध्ये उकडून घेतले. बटाटे सोलून बटाट्याचे चार ते सहा तुकडे केले. कढई गॅसवर ठेवली. दोन चमचे साजूक तूप त्यात घातले. तूप गरम झाल्यावर गॅस स्लो केला. नंतर अर्धा चमचा जिरे, एक चमचा तीळ,अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचे तिखट टाकले. नंतर त्यात बटाटे परतून घेतले. त्यानंतर स्वादानुसार मीठ आणि आमसूल टाकले व पुन्हा बटाटे परतले. नंतर झाकण ठेऊन दोन मिनिट वाफ काढून घेतली. स्वादिष्ट भाजी,श्रीखंड पुरी सोबत खाताना मजा आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment