Sunday, June 22, 2014

शतशब्द कथा -विषकन्या


मुंबई-पुणे महामार्गावर लाल रंगाचे भडक आणि सौंदर्य खुलवून दाखविणारे वस्त्र परिधान केलेली ती  सुंदरी गाडीला टेकून पुस्तक वाचत उभी होती.

"च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी!" पुटपुटत त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि तिच्या नजरेला-नजर भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हसंत-हसंत, हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.

"च्यायला पोरगी पटली. ...अररे.रे..." समोर वळण आहे तो विसरला होता. वेगवान बाईकने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली.

किर्रर्र... माझ्याच गाडी खाली यायचं होत का, हरामखोराला? आता बोंबला -ट्रक ड्राईवर.

"आईग!" ती किंचाळली. हातातल्या पुस्तकाने तिने पटकन चेहरा झाकला. पुस्तकाच्या कवरवर मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘विषकन्या'.
              

3 comments:

  1. शेवट छान धक्कादायक आहे .

    ReplyDelete
  2. शेवट छान धक्कादायक आहे .

    ReplyDelete
  3. कथा मस्तंच! ये दिल मांगे मोअर...

    ReplyDelete