Sunday, May 25, 2014

स्वादिष्ट मिर्ची (तोंडी लावायला)

 

दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ  विदर्भातली).  पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली.

साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ.


कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या. एका काचेच्या भांड्यात मिरच्या ,लिंबाचा रस, मोहरीची डाळ आणि मीठ कालवून  मिरच्याना १ दिवस मुरु द्या. या मिरच्या  फ्रीज मध्ये ठेवल्यास ८-१० दिवस टिकतात. फ्रीज नसल्यास ६-७ दिवस टिकतात. 



No comments:

Post a Comment