एकदा काही उंदरांनी मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा कट केला. एक धाडसी उंदीर एक घंटी घेऊन ती मांजरीच्या गळ्यात बांधण्यास निघाला. बाकी उंदीर ही दुरून तमाशा बघू लागले. एकदा घंटी मांजरीच्या गळ्यात बांधली की मांजरीच्या येण्याचा पत्ता आपल्याला लागेल व मांजर कुणा ही उंदराचा शिकार करू शकणार नाही.
पण मांजर ही मोठी धूर्त होती. तिला या कटाचा वास लागला. तीही डोळे बंद करून गुपचूप पडून राहिली. उंदीर जवळ येताच तिने उंदरावर झडप घातली. नेहमी प्रमाणे बाकीचे उंदीर आपापल्या बिळात लपून गेले. त्या धाडसी उंदीराची प्राणांतक किंकाळी आणि सर्व शांत झाल.
मांजरीने ही एक ढेकर देत आपल्या मिश्यांवर ताव दिला व एका पायाने घंटीला उडविले. मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला होता. सहज लक्ष गेल त्या घंटीवर 'लोकपाल' असे शब्द कोरलेले होते.
No comments:
Post a Comment