कालच वर्तमान पत्रात वाचल हरियाणाच्या एका कोर्टाने समलेन्गिक जोडप्याच्या संरक्षण देण्याचे आदेश दिले कारण समाज त्या जोडप्याच्या जीवावर उठलेला आहे. समाज समलेन्गिक संबंधाना एक विकृती म्हणून पाहतो आणि अश्या संबंधांचा विरोध करतो. तर दुसरी कडे काही बुद्धीजीवी (?) अश्या संबंधाना कायद्याचे संरक्षण देणे काळाजी गरज आहे असे मानतात. सरकारने कायदा बनवून समलेन्गिक विवाहाला मान्यता द्यावी अशी त्यांची अपेक्षा. प्रत्येक माणसाला त्याचा हिशोबाने जीवन जगण्याची स्वतंत्रता आहे आणि या स्वतंत्रेच रक्षण करण सरकारच दायित्व आहे.
आपण परमेश्वराच्या 'अर्ध-नारीश्वर' या स्वरूपाचे पूजन करतो. स्त्री-पुरुषाचे मिलन मानवजातीच्या अस्तित्व करता आवश्यक आहे याचेच प्रतिक म्हणजे "अर्धनारीश्वर". आपणास माहित आहे, परमेश्वरच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला "बिग बैंग" असे म्हणतात. त्या क्षणापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव " एका पासून अनेक होण्याची" इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होते. परमेश्वराने स्त्री-पुरुष या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसर्या कडे आकर्षित होतात. स्त्री 'बीज', पुरुष वीर्य ' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्त्री-पुरुषांच्या मिलनाचा मूळ उदिष्ट संतान प्राप्ती होय या मुळेच 'एका पासून अनेक होण्याची" मानवाची इच्छा पूर्ण होते. केवल यौन आनंदा साठी होणार्या स्त्री-पुरुष संबंधाना आपल्या प्राचीन मनीषीनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या सम्बंधान मुळे विकृत संतती निर्मित होते. म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी, स्त्री-पुरुषांच्या या संबंधाना 'विवाह' या रूपाने परिभाषित केले.
समलेन्गिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची 'एका पासून अनेक होण्याची' मूळ इच्छा पूर्ण करू शकतो का? आपण सर्वाना माहित आहे. बिना पुरुष वीर्य धारण केल्या स्त्री बीज फलित होऊ शकत नाही. समलेन्गिक व्यक्ती 'एका पासून अनेक होण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. आपणास वाटत असेल केवळ यौन आनंदा साठी समलेन्गिक संबंध ठेवले जात असतील. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुरू आहे. 'आनंद' निर्मिती मधे असतो जिथे पुरुष वीर्य आणि स्त्री बीज फलित होऊ शकत नाही अश्या मानवजातीला विनाश्याच्या मार्गावर नेण्यार्या समलेन्गिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात. खरे म्हणजे समलेन्गिक्ता माणसात दडलेली एक विकृती आहे. एक मानसिक बिमारी आहे. सम लेन्गिक व्यक्ती कडे सहानभूतीने पाहून, योग्य डॉक्टरी सल्ला आणि चिकित्सा केल्यास त्याला या विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते. समलेन्गिक्तेला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला विनाशाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. मानसिक रोगाने झपाटलेल्या समलेन्गिक समर्थकांचा विरोध कारणे ही काळाजी गरज आहे.
No comments:
Post a Comment