Wednesday, April 6, 2011

नाव ,विवाद आणि पैसा / गणितीय समीकरण



आजच्या माहिती युगात नावाला अत्यंत महत्व आहे. डोक्याला लावणाऱ्या तेला पासून ते पायातले जोडे नावामुळेच विकले जातात. आज प्रत्येक नाव एक ब्रांड आहे आणि त्याची एक विशिष्ट कीमत आहे.  एका रामायणातला प्रसंग आहेवानरांनी 'राम' नाव  लिहलेले दगड  समुद्रात फेकले, ते पाण्यावर तरंगू लागले. भगवंतांनी ही एक दगड समुद्रात टाकला. पण तो दगड पाण्यावर तरंगला नाही.  सर्वाना आश्चर्य वाटले.  दगड भगवंतानी टाकला असला तरी त्या दगडावर 'राम' लिहिलेले नव्हते म्हणून तो बुडाला. अशी नावाची महिमा आहे. नावाला मिळणार्या किमतीसाठी नेता असो  अथवा कलाकार सतत धडपडत असतो. आज जर शेक्सपिअर हयात असता तर 'नावात काय आहे' अस म्हंटले नसतेसमर्थांनी म्हंटले आहे  " व्याप आटोप करिती. धके-चपेटे सोसती. तेणे प्राणी सदेव होती. देखत देखता". पण या साठी वेळ फार  लागतो.  खडतर तपस्या करावी लागते.  तेंव्हाच कोणी 'तेंडूलकर' किंवा लता मंगेशकर बनतो.

पण नाव कमविण्याचा एक सोपी मार्ग पण आहे. एका शायरने म्हंटले आहे  "बदनाम होंगे तो क्या नाम   होगा".  आज चित्रकार म्हंटल की डोळ्या समोर कुर्ता-पजामा  घातलेला दाढीवाला म्हातारा अर्थात फिदा हुसैन  डोळ्या समोर पटकन येतो. हुसैन साहेबाना नाव कमविण्याचा सौपा मार्ग सापडला होता. ते सतत विवादात राहतात, कित्येक खटले त्यांचा विरुद्ध सुरूच असतात. पण त्याचं नाव प्रचार माध्यमात या ना त्या कारणाने सदैव झळकत राहते. या मुळे त्यांचा नावाची मार्केट वेल्यू सतत वाढत राहते. आज कला जगतात हुसैन एक प्रसिद्ध 'ब्रांड नेम' आहेसुंदर चित्रा खाली जर 'नाव' नसेल तर ते कुणीही विकत घेणार नाही.  पण  चार आडव्या-तिरप्या रेषा  काढलेल्या  चित्रा खाली जर 'हुसैनहे नाव असेल तर तथाकथित  कला प्रेमी  लाखो रुपये खर्च करून  ते चित्र विकत घेतात.  कारण नावाला कीमत आहे कलाकृतीला नाही. राखी सावंत आणि मिकाचे चुम्बनही प्रचार माध्यमातून फार गाजले होते.  राखी सावंतचे ही 'नाव' झाले आणि मिकाचेही.  आता दोघ भरपूर पैसे कमवितात आहे.

नाव, विवाद आणि पैसा हे समीकरण गणिताच्या भाषेत आपण सहज मांडू शकतो.

नाव + विवाद = प्रसिद्धी (नावाची मार्केट वेल्यू  )
प्रसिद्धी  =  पैसा 

प्रसिद्धी + विवाद = अधिक प्रसिद्धी + अधिक पैसा ....

पूनम पांडे नावाच्या  मॉडेलला काही दिवसांपूर्वी कुणीही ओळखत नव्हत. पण खेळाडूंसाठी 'विवस्त्र' होण्याची तिच्या नुसत्या विधानाने  तिचे नाव प्रचारमाध्यमातून शंभर कोटी लोकां पर्यंत पोहचल. साहजिकच आहे काही वकीलही नावासाठी तिच्या विरुद्ध खटले कायम करतीलच. अर्थात विवाद हा निर्माण होणारच आणि भविष्यातही तिचे नाव प्रचार माध्यमात झळकत राहणारचअशाने तिची मार्केट वेल्यू ही वाढेलच.  प्रसिद्धी आणि पैसा कमविण्याचा सोपी मार्ग तिला कळला आहे हे निश्चित. 

No comments:

Post a Comment