रविवारचा दिवस होता. सौ ने सकाळच्या नाश्त्या साठी छोले आणि पुरीचा बेत ठरविला होता. छोल्यांना फोडणी टाकली आणि पुरीची कणिक मळून ठेवली होती. तेवढ्यात पहाटे फिरायला गेलेले चिरंजीव पनीर घेऊन घरी परतले. येताच म्हणाले आई, सकाळी नाश्त्यासाठी पनीरचे काहीतरी कर. सौने उत्तर दिले राजा, पुरीची कणिक आधीच मळलेली आहे. तो म्हणाला आई मग पनीर टाकून पुरी कर. चिरंजीवांची सूचना आमच्या सौ.ला पटली. पण या आधी सौ. ने कधी पनीरची पुरी केली नव्हती आणि मी हि कुठे खाल्ली आहे, हे आठवत नव्हते. तसे बटाटा आणि पनीरचे परांठे पुष्कळदा खाल्ले आहेत. सौ. ने पनीर किसले त्यात तिखट मीठ आणि चाट मसाला घातले. नंतर लक्ष्यात आले घरात कोथिंबीर नाही. कोथिंबीर एवजी १ चमचा कसुरी मेथी टाकली. नंतर मिश्रण एकजीव केले. मिश्रणाचे लहान लहान गोळे करून ठेवले.
साहित्य: पनीर: 200 ग्राम, कसुरी मेथी १ चमचा, १ चमचा तिखट, १ चमचा चाट मसाला आणि चिमूटभर मीठ (मिश्रणात जास्ती मीठ टाकायची गरज नाही, कारण पुरी आपण छोल्यांसोबत खाणार आहोत).
कणिक ३ वाटी पुरी साठी आणि तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार (२ वाटी).
कणिक ३ वाटी पुरी साठी आणि तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार (२ वाटी).
कणकिच्या पारीत पनीरचा गोळा भरून सौ. पुरी लाटत होती आणि मी त्या तेलात तळत होतो. पुरी तळणे मला नेहमीच आवडते. सौ. चे हि म्हणणे आहे, तुमच्या हाताला तेल कमी लागते. यात किती तथ्य आहे, अजून तरी मला कळलेले नाही. पण एक मात्र खरं, मेहनत का फळ मीठा होता ही है. छोल्या सोबत सौ. ने माझ्या आवडीची सेवईची खीर हि केली होती.
No comments:
Post a Comment